Monday 14 May 2018

तसा हुशार आहे, पण ..


तसा हुशार आहे, पण .. 

कित्येकदा मुला-मुलीं बद्दल असं ऐकायला मिळतं. मूळची हुशार असतात पण अभ्यासात हवे तेवढे चांगले गुण /grades मिळत नाहीत. असे का होत असावे?

आई वडिलांना विचारले असता त्यांचे म्हणणे असते कि "अभ्यासात लक्षच नाही, सारखा मोबाइल घेऊन बसतो, परीक्षेच्या ऐनवेळी  अभ्यास हाती घेतो आणि मग डोंगराएवढा  अभ्यास बघून घाबरून जातो". किंवा, "अभ्यासाचे मुळीच टेन्शन नाही, कुठल्या गोष्टी ची किंमत नाही, आमच्या काळात नुसती नवी वही घ्यायची म्हणले  तर चार वेळा विचार करावा लागत होता, आजकाल च्या मुलांना आम्ही सर्व काही देतो पण त्याचं चीज करतील तर ना. कित्ती स्पर्धा आहे आज, पण सर्व लक्ष खेळण्यात. हुशारी वाया चाललीये".

कुठे बरं चुकत असेल मुलांचं , आपलं, किंवा शाळांचं ? 

आजचा काळ बदलत चालला आहे. नव्या पिढी पुढील challenges वेगळी आहेत . त्या मुळे आपल्या काळातील solutions आज उपयोगी पडत नाहीत. रागावून, मारून, धमकावून कसलाच उपयोग होत नाही, किंबहुना विपरीत परिणाम होतो. डिप्रेशन, चिंता  आणि आत्महत्या, राग इत्यादी समस्या वाढतच चालल्या आहेत. जीवनात यश मिळवण्यात  परीक्षेतील हुशारीचा काही  वाटा  जरूर  असतो तरी इतर  काही  गुणांचा  मात्र  बराच  वाटा  असतो. उदा. आपल्या भावनांना नियंत्रित  करणे, स्वतःहुन कामं पूर्ण करणे, मेहनत करताना होणारा त्रास सहन करणे, स्वतः च्या वर्तनाचा परिणाम काय होईल याची जाणीव ठेवणे, दुसऱ्यांबद्दल काळजी, आदर, स्वीकार, स्व-जवाबदारी, शिस्त, चिकाटी इत्यादी गुण शाळॆतच शिकवले तर?

"तसा हुशार आहे, पण .." म्हणण्याची वेळ येणार नाही.

डॉ. शिशिर पळसापुरे
मानसोपचार तज्ज्ञ, ट्रेनर.
CORE इमोशनल एडुकेशन प्रोग्रॅमचे जनक.
www.coreforschools.com




Image: Pixabay